Rohit Sharma : धोनी असं काय म्हणाला की रोहित शर्मा स्वतःवर कंट्रोलही करु शकला नाही, पाहा Viral Video
मुंबई मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स पार पडला. या कार्यक्रमाला सुनील गावस्कर, ब्रायन लारा, वरुण चक्रवर्ती, केन विल्यमसन आणि टेम्बा बावुमा सारखे दिग्गज खेळाडू देखील उपस्थित होते. एवढ्या मोठ्या हस्तींसोबत तिथे इंडियाचा स्टार खेळाडू आणि हिटमॅन म्हणजेच रोहित शर्मा देखील उपस्थित होता. जिथे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
38 वर्षीय रोहित शर्माने या स्टार-स्टड इव्हेंटमध्ये मरून ब्लेझरमध्ये डॅशिंग दिसत होता. रोहित शर्माने आपल्या आकर्षक आणि आकर्षक लूकने चाहत्यांना थक्क केले. या कार्यक्रमादरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये तो एका चेअरवर बसला आहे, आणि त्याच्या मागे त्याची पत्नी रितिका त्याच्या मागच्या चेअरवर बसली होती.
यादरम्यान अचानक रोहित शर्माला रडू कोसळले, मात्र हे अश्रू दुःखाचे नसून आनंदाचे आणि हास्याचे होते. सीएट अवॉर्ड्स शोमध्ये मिमिक्री सत्र सुरू झाले असताना धोनीची नक्कल सुरू होती, त्यावेळी त्याची मिमिक्री बघून रोहित शर्मा हसू कंट्रोल झालं नाही आणि त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ज्यामुळे एका क्षणासाठी असं वाटू लागलं की, रोहित शर्मा रडतोय की काय? तो इतका जोरात हसला की त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याची पत्नी रितिका त्याच्या मागे बसली होती आणि ती देखील हसताना दिसली.
यावेळी रोहित शर्माने महत्त्वाची गोष्ट सांगिली, तो म्हाणाला की, "चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयात राहुल द्रविडचं मोठं योगदान आहे. टी-20 विश्वचषक विजयादरम्यान राहुल द्रविडने स्थापित केलेली प्रक्रिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही सुरू राहिली आणि त्याचे निकाल बरेच सकारात्मक होते."
चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान गौतम गंभीर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते, परंतु रोहित शर्मा यांनी राहुल द्रविडचा उल्लेख केला. दरम्यान रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे. मात्र तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यात टीम इंडियाकडून खेळताना पाहायला मिळणार आहे. तसेच 2027 च्या विश्वचषकातील त्याचा सहभाग आता अनिश्चित आहे.