Vaibhav Suryavanshi IPL 2025 : छान खेळला! 35 बॉलमध्ये शतक गाजवणाऱ्या वैभवसाठी सचिन तेंडुलकरकडून कौतूकाची थाप
सध्या आयपीएलचं महासंग्राम पाहायला मिळत आहे. कालचा राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात चुरस पाहायला मिळाली. यावेळी राजस्थानने आपल्या बालेकिल्ल्यात मानाचा विजय मिळवला आहे. यावेळी या विजयाचे श्रेय राजस्थानचा युवा खेळाडू वैभव सुर्यवंशी याला गेलं आहे. त्याने चक्क 38 बॉलमध्ये 101 धावा करत कमालीची कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीचं राजस्थानकडूनचं नव्हे तर इतर संघाच्या खेळाडूंकडून देखील कौतून केल जात आहे. अशातच भारताचा सर्वोत्तम आणि गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने देखील त्याच कौतुक केलं आहे.
क्रिकेटमधील कोणत्याही स्पर्धेत एखाद्या खेळाडूने आपली उत्कृष्ट कामगिरी बजावली तर सचिन तेंडुलकर हे त्या खेळाडूला शुभेच्छा देत आणि त्याला प्रोत्साहित करत त्यासंबंधी काही ना काही पोस्ट शेअर करताना पाहायला मिळतात. क्रिकेटमधील ग्रेट व्यक्तीकडून आपलं कौतुक केल जात आहे हे पाहून त्या खेळाडूला आणखी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. वैभव सुर्यवंशीच्या जबरदस्त खेळीनंतर सचिन तेंडुलकरने त्याच्यावर कौतूकाची थाप मारत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये वैभवचा एक फोटो आहे आणि त्याच्या कॅप्शनमध्ये "वैभवचा निर्भय दृष्टिकोन, फलंदाजीचा वेग, लवकर लेंथ निवडणे आणि चेंडूमागे ऊर्जा हस्तांतरित करणे हे एका शानदार खेळीचे सूत्र होते. अंतिम निकाल: ३८ चेंडूत १०१ धावा. छान खेळला!!" असं लिहण्यात आलं आहे. यावर वैभव सुर्यवंशी सचिन तेंडुलकरचे आभार मानत म्हणाला की, "धन्यवाद सर, म्हणजे खूप खूप". तसेच सचिन तेंडूलकरने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव होत आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर यावेळी गुजरातने राजस्थानसमोर 210 धावांच आव्हन ठेवले होते. जे पुर्ण करत राजस्थानने 212 धावा करत दणदणीत विजय मिळवला. यावेळी वैभव सुर्यवंशीची सुपर कामगिरी राजस्थानच्या विजयाची कमान ठरली. त्याने 35 बॉलमध्ये 7 चौकार आणि 11 षटकारांसह शतक ठोकले. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत त्याने मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर अशा अनुभवी गोलंदाजांविरूद्धही मोठे शॉट्स खेळले. आयपीएल टी20 इतिहासात सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू ठरला आहे.