Shardul Thakur In Ranji Trophy: रणजी ट्रॉफीमध्ये पहिल्यांचा असा रिकॉर्ड! मुंबईच्या गोलंदाजांचा भेदक मारा अन् मेघालयचे वाजवले बारा
रणजी करंडक स्पर्धेत मेघालयविरुद्ध मुंबई यांच्यात अनोखा सामना पाहायला मिळाला असून हा सामना पहिल्या अडिच तासातच मुंबईने संपवला. शार्दूल ठाकूरच्या तुफान गोलंदाजीने मेघालयच्या फलंदाजांची धर का पळ अशी अवस्था केल्याचं पाहायला मिळालं. मेघालय संघाच्या स्कोअरबोर्डवर 2 धावा असताना 6 विकेट घेत शार्दूल ठाकूरने त्याच्या दुसऱ्या षटकात हॅटट्रिक केली आहे.
मात्र, या सामन्यात मेघालय संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. जम्मू-काश्मीरकडून पराभव पत्करल्यानंतर मुंबई संघाला स्पर्धेत कायम राहण्यासाठी मेघालयविरुद्धचा सामना बोनस गुणांसह जिंकावा लागणार आहे. मेघालयच्या संघाने अवघअया 2 धावांवर 6 विकेट गमावत 86 धावा केल्या. मोहित अवस्थीने तीन फलंदाजांना गारद केलं. डिसूझानं दोन विकेट घेतल्या.
मेघालयचे सहा फलंदाज शून्यावर बाद झाले. फक्त चार फलंदाज दोन आकडी धावा करू शकले. मात्र, संघाला १०० धावांची मजल मारून देण्यात अपयशी ठरले. मेघालयकडून हिमन याने 24 चेंडूंवर 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावांची खेळी केली. यावेळी संघासाठी शार्दूल ठाकूरची महत्त्वाची भूमिका दिसून आली.