Team India Captain Shubhman Gill : टीम इंडियाचा नवा कर्णधार शुभमन गिल वर्षाला किती कमावतो? जाणून घ्या

Team India Captain Shubhman Gill : टीम इंडियाचा नवा कर्णधार शुभमन गिल वर्षाला किती कमावतो? जाणून घ्या

शुभमन गिल: टीम इंडियाचा कर्णधार म्हणून निवड, किती आहे त्याची कमाई? वाचा सविस्तर.
Published by :
Prachi Nate
Published on

आज शनिवारी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या कसोटी सामन्यांसाठीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचा नवनिर्वाचित कर्णधार म्हणून शुभमन गिल तसेच उपकर्णधार म्हणून रिषभ पंत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघातील खेळाडूंची नावेही जाहीर केली गेली.

या संघात शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईस्वरन, करुण नायर, नितिश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांचा समावेश असणार आहे. ही घोषणा भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी ही घोषणा केली. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी शुभमन गिल भारतीय कसोटी संघाची धुरा सांभाळणार आहे.

आतापर्यंत शुभमन गिलने भारताकडून कसोटीमध्ये 32 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 5 शतक आणि 7 अर्धशतक मारत1 हजार 293 धावांची खेळी खेळली आहे. गिलची आतापर्यंतची संपत्ती 34 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. ज्यात टीम इंडियाकडून वनडे, टी-ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेट खेळणारा शुभमन गिल बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 'ए ग्रेड' मध्ये पाहायला मिळतो. त्याचसोबत यातून तो वर्षाला 5 कोटींची कमाई करतो. त्याचसोबत आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स या संघाचा कॅप्टन म्हणून यंदाच्या सीझनसाठी शुभमन गिलला 16 कोटींची बक्कळ रक्कम देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com