IND vs ENG : इंग्लंड विरुद्ध सामन्यात स्मृती मंधाना नवा रेकॉर्ड, ऑल फॉरमॅटमध्ये ठरली शतकवीर

IND vs ENG : इंग्लंड विरुद्ध सामन्यात स्मृती मंधाना नवा रेकॉर्ड, ऑल फॉरमॅटमध्ये ठरली शतकवीर

भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लडचा पराभव केला आहे. तसेच इंग्लंड विरुद्ध सामन्यात स्मृती मंधानाने नवा विक्रम नावे केला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यानची पाच सामन्यांची टी20 मालिका 28 जूनपासून सुरू झाली असून पहिल्याच सामन्यात भारताकडून दणदणीत सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामना नॉटिंगघमला पार पडला. दरम्यान यावेळी स्मृती मानधनाने टीम इंडियाचे नेतृत्त्व स्मृती मानधना हिने केलं होत.

संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर यांची तब्येत ठिक नसल्या कारणाने कर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मंधानाला देण्यात आलं होत. तिने कर्णधारपद हाती घेत भारतासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी केलीच, त्याचसोबत इंग्लंडला चांगलाच इंगा देखील दाखवला आहे. यावेळी इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियाकडून फलंदाजीसाठी सर्वप्रथम शफाली वर्मा आणि स्मृती मानधना मैदानात उतरली. स्मृतीने अर्धशतक करत चमकदारी खेळी केली. तसेच दुसरीकडे शेफालीने 20 धावांचे योगदान करत स्मृतीला चांगली साथ दिली. भारताने पहिला फलंदाजी करत 210 धावांच आव्हान दिलं. जे पुर्ण करण्यात इंग्लंड अपयशी ठरलं असून इंग्लंड पहिल्याच सामन्यात अवघ्या 113 धावा केल्या आहेत.

स्मृती मंधानाची लक्षवेधी खेळी

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात स्मृती मंधाना ही प्लेअर ऑफ द मॅच ठरली आहे. कसोटी, वनडे आणि टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी स्मृती मंधाना भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. इंग्लंड विरुद्ध सामन्यात शेफालीच्या भागीदारीसह मंधानाने अर्धशतक झळकावले. तसेच कसोटीमध्ये दोन शतके, वनडेमध्ये तिनं 11 शतकं झळकावली आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com