Sourav Ganguly Daughter: बसची धडक सुदैवाने बचावली सौरव गांगुलीची लेक! जाणून घ्या...

Sourav Ganguly Daughter: बसची धडक सुदैवाने बचावली सौरव गांगुलीची लेक! जाणून घ्या...

सौरव गांगुलीच्या मुलीच्या कारला कोलकात्यात बसने धडक दिली, मात्र सुदैवाने सना गांगुलीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी बस चालकाला अटक केली.
Published by :
Prachi Nate
Published on

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या मुलीच्या कारला कोलकात्यातील डायमंड हार्बर रस्त्यावरील बेहाला चौरस्ता परिसरात बसने धडक दिल्याची घटना घडली आहे. मात्र सुदैवाने सना गांगुली हिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. सना गांगुलीने घडलेला साऱ्या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्या बरोबर घटनास्थळी धाव घेत असणाऱ्या बस ड्रायव्हरला सना गांगुलीच्या कार चालकाने त्याचा पाठलाग करत साखर बाजारजवळ त्याला पकडले आणि त्याला अटक करण्यात आली आहे.

नेमक काय घडलं ?

घटनास्थळी उपस्थित लोकांनी घटनाक्रम सांगताना सांगितले की, सना गांगुलीच्या कारला कोलकात्याहून रायचककडे जाणाऱ्या बसने अचानक धडक दिली ज्यामुळे हा अपघात घडून आला. सना गांगुली कारमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटवर बसल्यामुळे या अपघातातून ती थोडक्यात बचावली. दरम्यान गांगुली कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळाल्यानंतर, कोलकाता पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी आरोपी बस चालकाला अटक केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com