KKR vs SRH IPL 2025 : वेंकटेश अय्यर ठरला हुकमाचा एक्का! हैदराबादला पळता भूई करत केकेआरने मिळवला दणदणीत विजय

KKR vs SRH IPL 2025 : वेंकटेश अय्यर ठरला हुकमाचा एक्का! हैदराबादला पळता भूई करत केकेआरने मिळवला दणदणीत विजय

वेंकटेश अय्यरच्या तुफानी खेळीमुळे केकेआरचा हैदराबादवर दणदणीत विजय, 80 धावांनी मात!
Published by :
Prachi Nate
Published on

काल कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हैदराबाद सनरायझर्स हा सामना ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला असून हैदराबादला या सामन्यादरम्यान मोठा पराभव पतकारावा लागला. यावेळी केकेआरने हैदराबादला 80 धावांसह पराभूत केल. कोलकाताने काल पहिली फलंदाजी केली होती. ज्यात त्यांनी हैदराबादला 201 धावांच आव्हान दिलं होत. ज्याला पुर्ण करण्याचा पाठलाग करत हैदराबाद अवघ्या 120 धावांवर सर्वबाद झाला. हैदराबादचा हा तिसरा पराभव असून कोलकाताने दुसरा विजय मिळवला आहे. कालच्या सामन्यात सर्वात सलामवीर कामगिरी ठरली ती कोलकाताच्या वेंकटेश अय्यरची. त्याने केकेआरला शेवटच्या ओव्हरमध्ये सावरलं होत.

वेंकटेश अय्यर केकेआरसाठी ठरला नायक

केकेआरची सुरुवातीची फलंदाजी काहीशी खास पाहायला मिळाली नाही. वेंकटेश अय्यरने एकून 60 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याने पहिल्या 10 बॉलमध्ये 11 धावा केल्या. त्यानंतर त्याने 21 ते 29 बॉलमध्ये 7 चौकार आणि 3 षटकारांची आक्रमक चौकार षटकार मारले, ज्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकात 6 गडी गमवून 200 धावा गाठू शकली. आयपीएल 2025मध्ये वेंकटेश अय्यरने कोलकातासाठी पैसा वसूल फलंदाजी केली. याउलट हैदराबादची टॉप ऑर्डर ढेपाळल्यानंतर संघ पुन्हा सावरू शकला नाही आणि परिणामी त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळी वेंकटेश अय्यर हैदराबादवर पुन्हा एकदा भारी पडला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com