Suryakumar Yadav : पाकिस्तानबद्दल 'हा' प्रश्न विचारणे बंद करा...,कर्णधार सूर्यकुमार पत्रकारांवर बरसला

Suryakumar Yadav : पाकिस्तानबद्दल 'हा' प्रश्न विचारणे बंद करा...,कर्णधार सूर्यकुमार पत्रकारांवर बरसला

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) भारत आणि पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा पाकिस्तानला लोळवलंय.सुपरफोर सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्सने धुव्वा उडवला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्सने धुव्वा उडवला

  • पाकिस्तानने भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं

  • सामन्याबद्दल भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रया दिली

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) भारत आणि पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा पाकिस्तानला लोळवलंय. सुपरफोर सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्सने धुव्वा उडवला आहे. आशिया चषकातील भारताचा पाकिस्तानवर हा दुसरा विजय असून सामन्यामध्ये 172 धावांचं आव्हान पाकिस्तानने भारतासमोर ठेवलं. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या जोरदार फलंदाजीवर भारताने हे लक्ष्य आरामात गाठलं. या सामन्यात भारताचा फलंदाज अभिषेकने 39 चेंडूमध्ये 6 चौकार आणि 5 षटकारांसह 74 धावा केल्या आहेत. तर शुभमनने 47 धावा करीत टीमला योगदान दिलंय. संजू सॅमसन आणि तिलक वर्मान विजय खेचून आणला. या सामन्याबद्दल भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रया दिली आहे.n भारतीय फलंदाजांनी हे लक्ष्य सहज गाठले. पण टीम इंडियाच्या कोचने भारतीय खेळाडूंना मेल धाडले,असे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर सांगितले.

पुढे सूर्यकुमार यादव म्हणाला की, चांगली सुरुवात पाकिस्तानने केली होती. 91 धावा पहिल्या 10 षटकांत त्यांनी केल्या,खेळाडूंना मी ड्रिंक्स ब्रेकमध्ये सांगितले,खरी लढाई आता सुरू होते. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने संघाने कामगिरी केली, त्याने मला खूप आनंद झाला आहे.

तो पुढे म्हणाला, “शिवम दुबे काही रोबोट नाही. त्याचाही एखादा दिवस खराब जाऊ शकतो. पण तो ज्या प्रकारे सामना फिरवतो, ते पाहून आनंद वाटतो.” गिल-अभिषेकबद्दल म्हणाला की, शुभमन आणि अभिषेक म्हणजे अगदी आग आणि बर्फ यांचा संगम आहे. ते एकमेकांना चांगली साथ देतात. एखाद्या फलंदाजाने लक्ष्याचा पाठलाग करताना 10-12 ओव्हर्स एखाद्या फलंदाजाने टिकून राहणे गरजेचे असते आणि त्यांनी तेच केले.”

या सोबतच सूर्यकुमार यादवने पुढे अजब विधान केलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये आता कोणतेही शत्रुत्व उरलेले नाही असं तो म्हणाला, ज्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान आशिया कप स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानला सहज हरवलं. त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स झाली, या प्रेस कॉन्फरन्स दरम्यान सूर्यकुमार यादवला एका रिपोर्टरने प्रश्न विचारला की, पाकिस्तान संघ अधिक स्पर्धात्मक वाटतोय का?” यावर उत्तर देताना सूर्या म्हणाला की, तुम्ही मला वाटतं की आता ( भारत-पाक) शत्रुत्वाबद्दल प्रश्न विचारणं बंद केलं पाहिजे, त्याचं कारण म्हणजे शत्रुत्व किंवा चुरस दोन देशांमध्ये (खेळांत)तेव्हा असते, जेव्हा दोन संघ 15-20 मॅचेस खेळतात आणि त्यात एखादी टी 8-7 अशा फरकाने पुढे असते, तेव्हा त्याला चांगलं क्रिकेट किंवा चुरशीची लढत म्हटलं जातं. पण जेव्हा एकतर्फी लढत असते तेव्हा ते फक्त उत्तम क्रिकेट असतं, चुरस नव्हे ” असं तो म्हणाला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com