Suryakumar Yadav : "आमच्यासाठी हा प्रवास..." टी20 वर्ल्डकपसाठी सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा!

Suryakumar Yadav : "आमच्यासाठी हा प्रवास..." टी20 वर्ल्डकपसाठी सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा पहिला सामना 29 ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे खेळवण्यात येणार आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा पहिला सामना 29 ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पत्रकार परिषदेत आगामी टी20 वर्ल्डकपविषयी मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताची वर्ल्डकपसाठीची तयारी एशिया कप 2025 पासूनच सुरू झाली आहे.

एशिया कप जिंकल्यानंतर आता भारतीय टी20 संघ सूर्‍यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेला आगामी वर्ल्डकपची तयारी मानत सूर्यकुमार म्हणाले की, “आम्ही या मालिकेकडे वेगळ्या आव्हानाप्रमाणे न पाहता आमच्या टी20 प्रक्रियेचा विस्तार म्हणून पाहत आहोत. आमच्यासाठी हा प्रवास एशिया कपपासूनच सुरू झाला आहे आणि तोच पुढे वर्ल्डकपपर्यंत चालणार आहे.”

टीम कॉम्बिनेशनमध्ये स्थिरता राखली

सूर्यकुमार यांनी संघरचनेविषयी बोलताना सांगितले की, “संघात फारसे बदल नाहीत. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जसे आम्ही एक वेगवान गोलंदाज, एक ऑलराऊंडर आणि तीन फिरकीपटूंसह खेळलो होतो, तसाच तोल राखला आहे. येथेही उछाळ असलेली विकेट्स आहेत, त्यामुळे आमचा दृष्टिकोन तोच राहील.”

त्यांनी पुढे सांगितले की, “आमच्या तयारीचा पाया एशिया कपदरम्यानच रचला गेला. त्या वेळीच आम्ही टी20 स्वरूपात सातत्याने खेळायला सुरुवात केली आणि आता प्रत्येक मालिका आम्हाला वर्ल्डकपच्या दिशेने मजबूत करते आहे.”

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तगडा सामना अपेक्षित

सूर्यकुमार यांनी ऑस्ट्रेलियाला “खूबसूरत आणि आव्हानात्मक” क्रिकेट देश असे संबोधले. त्यांनी म्हटले, “ऑस्ट्रेलिया हे क्रिकेटसाठी एक सुंदर ठिकाण आहे. येथे खेळताना नेहमीच नवी ऊर्जा मिळते. निश्चितच ही मालिका कडवी होईल आणि आमच्यासाठी चांगली चाचणी ठरेल.”

टीमची मानसिकता कायम

त्यांनी हेही स्पष्ट केले की, “भलेही पुढील काही सामने आशियाई परिस्थितीत होणार असले तरी आमची मानसिकता बदललेली नाही. आम्ही जिथेही खेळतो, तेथील परिस्थितीला जुळवून घेत आपली खेळशैली कायम ठेवतो. ही मालिका वर्ल्डकपच्या तयारीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

भारताने अलीकडेच एशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. आता त्या आत्मविश्वासासह टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर उतरली आहे. पहिला सामना कॅनबेरा येथे खेळवला जाणार असून दोन्ही संघ या मालिकेत विजयासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com