ENG vs IND, Shubman Gill : शुभमन गिलची शतकासह चमकदार कामगिरी! नवे रेकॉर्ड ही रचले

ENG vs IND, Shubman Gill : शुभमन गिलची शतकासह चमकदार कामगिरी! नवे रेकॉर्ड ही रचले

भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने पदार्पण करताच चांगली कामगिरी केली आहे. तो कसोटीच्या पहिल्या डावात शतक करणारा सर्वात तरुण भारतीय कर्णधार बनला.
Published by :
Prachi Nate
Published on

भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला 20 जूनपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेची सुरुवात इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेने झाली. शुभमन गिल च्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत असून कर्णधार शुभमन गिलने पदार्पणातच चांगली कामगिरी करत आहे, त्याचसोबत अनेक विक्रम आपल्या नावे केले. इतकी चांगली सुरुवात झाल्यामुळे 17 वर्षानंतर पुन्हा एकदा विजेतेपद प्राप्त करण्याच्या दिशेने आपली टीम इंडिया योग्य दिशने वाटचाल करताना दिसत आहे.

काल लीड्स येथे इंग्लंड विरुद्धच्या सामन्यामध्ये कर्णधार शुभमन गिलने दमदार शतक ठोकले. शुभमन गिलच हे कसोटी सामन्यामधले सहावे शतक आहे. त्याने या सामन्यामध्ये केवळ शतकच केले नाही तर त्याबरोबर अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. शुभमन गिलचे आशिया खंडाबाहेरील हे पहिलेच तर परदेशातील दुसरे शतक आहे. इतकेच नव्हे तर शुभमन गिल हा वयाच्या 25 व्या वर्षी पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच दिवशी शतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे.

यासोबतच शुभमन गिल ने विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला आहे. विराटने हाच विक्रम त्याच्या वयाच्या 26 व्या वर्षी केला होता. त्याचबरोबर परदेशात शतक करणारा तिसरा युवा खेळाडूचा ही 'किताब शुभमन गिल च्या नावावर झाला आहे. यामध्ये पहिला नंबर सचिन तेंडुलकर तर दुसरा नंबर कपिल देव यांचा लागतो. मागच्या 17 वर्षापासून इंडियाला ही मालिका जिंकता आलेली नाही. 2007 मध्ये राहुल द्रविड कॅप्टन असताना भारताने ही मालिका जिंकली होती त्यानंतर आजतागायत भारताला ही मालिका जिंकता आलेली नाही.

त्यातच आपल्या टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी कसोटी सामन्यामधून निवृत्ती घेतल्यामुळे, टीम इंडियाला जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन्ही दिग्गज कसोटी सामन्यांमध्ये नसल्यामुळे आता शुभमन गिलला टीम इंडियाला 17 वर्षानंतर पुन्हा एकदा विजेतेपद प्राप्त करून देण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. यासाठी टीम इंडियाला खूप प्रयत्न करावे लागणार आहे.त्याचबरोबर यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फायनलपर्यंत जाण्यासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला हरवणे हे मोठं आव्हान असणार आहे. यामध्ये यश मिळालं तर भारता विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com