Axar Patel Baby Boy: टीम इंडियाचा बापू झाला बापमाणूस, काय ठेवलं मुलाचं नाव
भारतीय संघात सध्या बहुतेक खेळाडूंकडून आनंदाची बातमी ऐकायला मिळत आहे. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळत आहे. असं असताना टीम इंडियाचा बापू म्हणून ज्याला ओळखल जाते असा स्टार ऑलराउंडर अक्षर पटेल बाबा झाला आहे. त्याच्या घरी एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे.
हार्दिक, बुमराह, विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर आता अक्षर पटेलला देखील पुत्ररत्न झाले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत मुलाचे नाव आणि ही आनंदाची बातमी दिली आहे. यादरम्यान त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे, "तो अजूनही लेगमधून बाहेरची बाजू शोधत आहे, परंतु आम्ही त्याची निळ्या रंगात तुम्हा सर्वांशी ओळख करून देण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. जग, भारतातील सर्वात लहान, तरीही सर्वात मोठा चाहता आणि आमच्या हृदयाचा सर्वात खास भाग, हक्ष पटेल यांचे स्वागत करा. 19- 12- 2024".
असं म्हणत त्याने बाळाच्या जन्माची तारीख आणि त्याचे नाव सांगितले आहे. अक्षर आणि मेहा यांनी 2023 मध्ये आपली लग्नगाठ बांधली. या जोडप्याचे हक्ष हे पहिलं बाळ आहे. दरम्यान हक्षवर चाहत्यांकडून प्रेमाचा आणि आशिर्वादाचा वर्षाव होत आहे.