Womens World Cup 2025 : विश्व विजेत्या महिला क्रिकेट संघाला मिळणार इतक्या कोटींचे बक्षीस, खेळाडूंमध्ये विभागणी कशी होणार?

Womens World Cup 2025 : विश्व विजेत्या महिला क्रिकेट संघाला मिळणार इतक्या कोटींचे बक्षीस, खेळाडूंमध्ये विभागणी कशी होणार?

महिला टीम इंडिया फक्त वर्ल्ड चॅम्पियन बनला नाही, तर वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वाधिक बक्षिसाची रक्कम मिळवणारा मानकरी संघ देखील ठरली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

नुकताच नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडलेला महिला वनडे विश्वचषक 2025 चा अंतिम सामना पाहून दंगल मधला एक डायलोग आठवला... म्हारी छोरीया छोरो से कम हे के.... अशीच काहीशी कामगिरी भारतीय संघाच्या वाघीणींनी केली आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात कालचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. बरोबर 8 वर्षांपूर्वी महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला होता.

पण भारताच्या पोरींनी आपल्याच भूमीवर 55 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने महिला विश्वचषक 2025चं जेतेपद पटकावलं. महिला टीम इंडिया फक्त वर्ल्ड चॅम्पियन बनला नाही, तर वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वाधिक बक्षिसाची रक्कम मिळवणारा मानकरी संघ देखील ठरली आहे. मात्र ही रक्कम प्रत्येक खेळाडूमध्ये कशी विभागली जाणार याचा प्रश्न तुम्हाला देखील पडला आहे का? चला तर मगं जाणून घेऊयात....

मागील विश्वचषक स्पर्धेत टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानुसार पुरुष संघासाठी एक विभागणी नोंदवली गेली होती. 15 मुख्य खेळाडूंपैकी प्रत्येकाला ₹5 कोटी देण्यात आले होते. तसेच राखीव रक्कम ₹1 कोटी ही प्रशिक्षक/सपोर्ट स्टाफची रक्कम वेगवेगळी करण्यात आली होती.

त्यानुसार यंदा पाहायला गेल तर, महिला संघ जिंकल्यामुळे बीसीसीआय त्यांना सुमारे ₹50 कोटींचा बोनस देण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. तसेच आयसीसीकडून 4.48 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 40 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम महिला संघाला देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान तुम्हाला काय वाटत यावेळीही महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंमध्ये या रक्कमेची विभागणी होईल का? आणि झाली तर ती प्रत्येक खेळाडूंमध्ये कितीने विभागणी केली जाईल...

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com