Indian Cricketer : RCB च्या स्टार खेळाडूच्या अडचणीत वाढ! 'ते' आरोप सिद्ध झाल्यास तुरुंगवास होण्याची शक्यता
IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील वेगवान गोलंदाज यश दयाल सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. एका महिलेने त्याच्यावर लग्नाचं आमिष दाखवून मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेनं एफआयआर दाखल केला असून, तक्रार थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयातही सादर करण्यात आली आहे. यश दयालच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यश दयालचा हा अजामीनपात्र गुन्हा आहे.
अशातच आता त्याच्या अडचणीत अजून भर पडली आहे. यश दयालवर आरोप करणारी पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात येईल. त्याचसोबत तिने यश दयालसोबतचे व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रिनशॉट, व्हिडिओ कॉल आणि फोटो पोलिसांना दिले आहेत. हे पुरावे यश दयालच्या विरोधात मोठी अडचण ठरु शकतात. या पुराव्यांच्या जोरावर जर त्याच्यावरचा आरोप सिद्ध झाला तर त्याला भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 अंतर्गत यशला किमान 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
यश दयालने IPL कारकीर्दीची सुरुवात 2022 साली गुजरात टायटन्स संघातून केली होती. त्या वर्षी गुजरातने विजेतेपद मिळवलं होतं. 2024 पासून तो RCB संघात खेळत आहे. 2025 मध्ये RCB च्या विजयानंतर त्याच्या कामगिरीचं मोठं कौतुक झालं होतं. सध्या पोलीस याप्रकरणी चौकशी करत असून पुढील कायदेशीर कारवाईची वाट पाहिली जात आहे.