Asia Cup 2025 PAK vs UAE : आधी पाकिस्तान-यूएई सामना चर्चेत, नंतर सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू आला चर्चेत; थेट अम्पायरलाच चेंडू मारला
17 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये पार पडलेला आशिया कप स्पर्धेतील यूएई विरुद्ध पाकिस्तान सामना चांगलाच चर्चेत आला. पाकिस्तानने सुरुवातीला हा सामना खेळण्यास नकार दिल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र क्षणार्धात पाकिस्तानचा हा निर्णच होकारात बदलला, आणि यूएईसोबतचा सामना एक तास उशिराने खेळवण्यात आला. यावेळी यूएईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यादरम्यान पाकिस्तानने यूएईसमोर 146 धावांचे आव्हान ठेवले होते. जे पुर्ण करण्याच्या प्रयत्नात यूएई संघ अवघ्या 105 धावांवर गारद झाला अन पाकिस्तानने हा सामना 41 धावांनी जिंकला. त्याचसोबत भारतानंतर सुपर-4 मध्ये पोहोचणारा पाकिस्तान ग्रुप ए दुसरा संघ ठरला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर 4 सामना 21 सप्टेंबर रोजी होणार आहे.
तर दुसरीकडे यूएईसोबत पाकिस्तानचा सामना सुरु असातना पाकिस्तानच्या गोलंदाजाच्या कृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पाकिस्तानी खेळाडूच्या चुकीमुळे पंच जखमी झाला. झालं असं की, यूएईच्या डावात पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात पाकिस्तानचा विकेटकीपर हारिसने चेंडू फेकला. त्याने फेकलेला चेंडू अंपायर रुचिरा पल्लियागुरुगे यांच्या थेट डोक्याच्या मागे लागला.
ज्यामुळे अंपायर रुचिरा पल्लियागुरुगे यांच्या डोक्याला तीव्र वेदना होत असल्याचं पाहायला मिळालं. चेंडू लागताच अंपायर रुचिरा पल्लियागुरुगे मैदानातच उभे असलेल्या जागेवरच खाली बसले, त्यानंतर पाकिस्तानी खेळाडू धावत अंपायरजवळ गेले.
अंपायरला होत असलेल्या वेदना पाहून पाकिस्तानी खेळाडूंनी मेडिकल टीमला बोलावण्याचा इशारा केला. त्यानंतर पाकिस्तानचा फिजिओने कन्सशन टेस्ट केल्यानंतर अंपायर रुचिरा पल्लियागुरुगे यांना सामना सोडून मैदानाबाहेर बसण्याचे आदेश देण्यात आले. या घटनेनंतर माजी पाकिस्तानी खेळाडू वसीम अक्रमच्या टिप्पणीमुळे चाहते नाराज होते.