क्रिकेट
Vinod Kambli Discharged: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला डिस्चार्ज, लवकरच मैदानात उतरणार?
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला डिस्चार्ज मिळाला असून ते लवकरच मैदानात परतणार आहेत. दहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी प्रकृती बिघडल्यामुळे काही दिवसांपासून भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. दहा दिवस उपचार केल्यानंतर आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
विनोद कांबळी यांनी नववर्षात नागरिकांनी दारू तसेच इतर व्यसनापासून दूर राहावे असा संदेश दिला आहे. व्यसनामुळे आयुष्य उध्वस्त होऊ शकतो याचा अनुभव मला आहे, असं विनोद कांबळी म्हणाले आहेत. तर व्यसनामुळे आयुष्य उध्वस्त होऊ शकतो याचा अनुभव मला आहे असं ते म्हणाले.. त्याचसोबत त्यांनी माझी प्रकृती स्थिर असून लवकरच मी मैदानावर जाणार असं देखील ते म्हणाले आहेत. दरम्यान हॉस्पिटलमध्ये देखील इंडियाची जर्सी घालून त्यांनी फलंदाजी केली होती.