Virat Kohli In IND Vs PAK: विराट कोहलीच्या 'या'  कृतीचे  नेटकऱ्यांकडून  कौतुक

Virat Kohli In IND Vs PAK: विराट कोहलीच्या 'या' कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक

विराट कोहलीच्या नसीन शाहला मदतीच्या कृतीने चाहत्यांची मने जिंकली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Published by :
Team Lokshahi
Published on

काल दुबईच्या मैदानात भारत- पाकिस्तान प्रतिस्पर्धी एकामेंकासमोर आले होते. या सामन्या दरम्यान भारताने पकिस्तानचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. पकिस्ताने नाणेफेक जिंकून प्रथम फलदांजी करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी भारताला 242 धावांचे आव्हान मिळाले. भारताने ही 244 धावा पुर्ण करत 6 विकेट्स राखून पाकिस्तानवर विजय मिळवला. त्यामुळे भारताची चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सुरुवात चांगली झाली आहे.

भारत- पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यात विराट कोहलीचे शतक अधिक लक्षवेधी ठरले. विराटने चाहत्यांची मने जिंकली आहेतच, पण त्याच्या अजून एक कृतीने चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सामना सुरु असताना पाकिस्तान खेळाडू नसीन शाहच्या बूटची लेस सुटली. सुटलेली लेस बांधण्यासाठी नसीन खाली वाकत होता. पण पायाला लावलेल्या क्रिकेट बैटिंग पैड कवरमुळे त्याला खाली वाकता येत नव्हते. विराटने हे पाहिले आणि नसीनच्या बूटची लेस बांधण्यासाठी मदत केली. लेस बांधत असतानाचे दृश्य कॅमेरामध्ये कैद झाले. हा व्हिडीओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com