विजयानंतर विराट कोहली अंगठीला किस का केले? काय आहे त्यामागील रहस्य?
कालचा भारत पाकिस्तान सामना चांगलाच रंगला. भारताने 6 गडी राखून विजय मिळवला. विजयानंतर समस्त भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. या सामन्यादरम्यान विराट कोहलीने मात्र सगळ्या भारतीयांची मने जिंकून घेतली. विराटने शानदार शतक झळकवले आणि भारताला विजयदेखील मिळवून दिला. विराटवर सगळ्यांनीच प्रेमाचा वर्षाव केला आहे. दरम्यान त्याने अशी काही कृती केली ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.
सामन्यादरम्यान शतक पूर्ण होताच कोहलीने नेहमीप्रमाणे आकाशाकडे बघत बॅट उंचावली आणि त्याने देवाचे आभार मानले. नंतर लगेचच त्याने गळ्यातील लॉकेट टीशर्ट बाहेर काढले आणि त्यातील अंगठीचे चुंबन घेतले . हे दृश्य अनेकदा क्रिकेटच्या मैदानात बघायला मिळते. पण या अंगठीचं नेमकं रहस्य काय? असा प्रश्नदेखील अनेकांना पडतो. हे नक्की काय आहे? त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
अंगठीचं रहस्य
कोणताही सामना जिंकल्यानंतर किंवा शतक पूर्ण केल्यानंतर विराट बॅट उंचावून अभिवादन करतो. त्याचप्रमाणे तो गळ्यातील अंगठीलादेखील कीस करतो. पण ही अंगठी त्याच्यासाठी खुपच खास आहे. विराटच्या गळ्यातील ही अंगठी अनुष्का शर्माची आहे. ही अंगठी त्याच्यासाठी खुप लकी आहे असे तो म्हणतो. त्यामुळे ही अंगठी नेहमीच त्याच्या गळ्यात बघायला मिळते.