Virat Kohli RCB Won : अखेर विराटच्या सोशल मीडियावर झळकली विजयाची पोस्ट, पहिल्या ट्रॉफीसह सॉल्टचे देखील मानले आभार
3-06-2025 हा दिवस आणि ही तारीख आरसीबी तसेच सर्व क्रिकेटप्रेमी कधीच विसरणार नाही. यत्र तत्र सर्वत्र 18 असा कालचा सामना ठरला. अखेर 18 वर्षांची प्रतिक्षा आरसीबीच्या आणि विराटच्या कामी आली. तब्बल 17 वर्ष विजयासाठी लढत 3 वेळा फायनलमध्ये आलेल्या आरसीबीला आणि विराटला 18 व्या वर्षी यश मिळालं. अखेर त्याच्या देखील हातात आयपीएलची ट्रॉफी झळकताना पाहायला मिळाली. या विजयाने जितका भावून विराट झाला तितकेच त्याचे फॅन त्याला पाहून भावूक झाले.
यावेळी आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्याला विराटचे जुने साथीदार आणि आरसीबीचे माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल देखील अहमदाबादमध्ये उपस्थित होते. एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल या दोघांनी गेल्या काही वर्षात आरसीबीला आयपीएल ट्रॉफी मिळवून देण्यासाठी फार मेहनत घेतली आहे. मात्र नशिबापुढे काही चाललं नाही. आरसीबीने पंजाबवर विजय मिळवल्यानंतर विराटने डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलला घट्ट मिठी मारली. या विजयाने ते दोघे ही फार खुश झाल्याचे पाहायला मिळत होते. यादरम्यान विराटने फिल सॉल्ट आणि डिव्हिलियर्स बद्दल भावना व्यक्त करत सोशल मीडियावर स्टोरी ठेवली आहे. ज्यात त्याने दोघांसमोबतचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीला टाकला आहे.
पहिली स्टोरी फिल सॉल्टसोबतची टाकली आहे त्यात त्याने मिश्किल करत लिहलं आहे की, " शाब्बास जोडीदारा. आता खऱ्या गोष्टीकडे परत जा आणि डायपर बदलण्याची तयारी कर". सॉल्टची पत्नी गर्भवती आहे आणि लवकरच तिची डिलिव्हरी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यानिमित्ताने तो अंतिम सामना न खेळता त्याच्या मायदेशी परतण्याच्या शक्यता वर्तावली जात होती. मात्र त्याने तसं केलं नाही, त्याने आरसीबीला विजय मिळवून देण्यासाठी चांगली कामगिरी बजावली. यामुळे त्याचं खुप कौतुक केलं जात आहे.
तर पुढे डिव्हिलियर्ससोबतची स्टोरी टाकताना विराटने लिहलं की,"तुझा बिस्कीटही तितकाच" असं म्हणाला आहे. "बिस्कोटी" म्हणजे विराट कोहलीचे टोपणनाव आहे, आरसीबी संघात डिव्हिलियर्स विराटसाठी हे नाव वापरतो. तसेच पुढे यावर्षी विराटच्या देखील इंस्टाग्राम पोस्टला आरसीबीच्या विजयाची पोस्ट झळकली आहे.
"या संघाने स्वप्न साकार केले, असा हंगाम जो मी कधीही विसरणार नाही. गेल्या अडीच महिन्यांत आम्ही या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेतला आहे. हे आरसीबीच्या चाहत्यांसाठी आहे ज्यांनी कधीही वाईट काळात आमची साथ सोडली नाही. हे हृदयद्रावक आणि निराशेच्या सर्व वर्षांसाठी आहे. हे या संघासाठी खेळताना मैदानावर सोडलेल्या प्रत्येक इंचाच्या प्रयत्नांसाठी आहे. आयपीएल ट्रॉफीबद्दल - तू मला १८ वर्षे वाट पाहायला लावलीस की मी तुला उचलू शकेन आणि माझ्या मित्रा, पण ही वाट पाहण्यासारखी होती".