Virat Kohli : "सिंह म्हातारा होऊ शकतो पण..." किंग कोहलीचा तो फोटो व्हायरल अन् चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
क्रिकेटविश्वातील स्टार खेळाडू ज्याने केवळ भारतातच नव्हे तर जगभराच्या कानाकोपऱ्यात आपले फॅन फॉलोवर्स निर्माण केले आहेत, असा टीम इंडियाचा क्रिकेटपटू विराट कोहली अनेक कारणांनी चर्चेत येत असतो. आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीज 19 ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहे. यामध्ये टीम इंडिया तीन वनडे आणि पाच टी 20 सामने खेळणार आहे. अशातच विराट कोहलीचा एक फोटो मोठ्याप्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ज्यामुळे असा प्रश्न निर्माण होत आहे की, आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाकडून विराट कोहली खेळताना दिसणार की, नाही. विराट कोहलीचा शाश पटेल सोबतचा लंडनमधला फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोमध्ये विराट कोहलीची दाढी सफेद दिसते आहे. ज्यामुळे त्याच वय वाढलेलं दिसत आहे. या फोटोमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. विराट कोहली वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडल्याचं दिसून येत आहे.
विराट कोहलीने वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताला विजय मिळवून दिल्या नंतर टी 20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. तसेच इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेआधीच विराट कोहलीने टेस्ट फॉर्मेटमधून देखील निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे विराट कोहली सध्या फक्त वनडे क्रिकेटचा भाग असून त्याच वय 36 वर्ष आहे. त्यामुळे चाहत्यांना तो वनडे क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहे.
यावर विराटचे चाहते कमेंट करत म्हणाले की, "एकमेव प्रेम किंग कोहली, कोणीतरी सांगा की हे एडिट केले आहे , आपला क्रिकेटचा राजा म्हातारा झाला आहे, एकदिवसीय निवृत्ती लोड होत आहे..., तो फक्त 36 वर्षांचा आहे पण 56 सारखा दिसत आहे, 36 व्या वर्षी काही लोक त्यांचे शिक्षण पूर्ण करतात, सिंह म्हातारा झाला तरी विराट कोहली क्रिकेटचा राजा राहील" अशा प्रतिक्रिया कोहलीच्या चाहत्यांकडून दिल्या जात आहेतत.