Asia Cup Trophy Controversy :  टीम इंडियाला ट्रॉफी कधी मिळणार? BCCI चं मोहसीन नकवींना अल्टिमेटम

Asia Cup Trophy Controversy : टीम इंडियाला ट्रॉफी कधी मिळणार? BCCI चं मोहसीन नकवींना अल्टिमेटम

भारताने आशिया कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तानला पराभूत करत जिंकला. पाच गडी राखून भारताने 147 धावांचं लक्ष्य सहज गाठत नवव्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • टीम इंडियाला ट्रॉफी कधी मिळणार?

  • नकवींच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाचा नकार

  • ACC अध्यक्षांचा वादग्रस्त पवित्रा

भारताने आशिया कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तानला पराभूत करत जिंकला. पाच गडी राखून भारताने 147 धावांचं लक्ष्य सहज गाठत नवव्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. मात्र या ऐतिहासिक विजयाच्या आनंदावर ‘ट्रॉफी विवादा’ची छाया पडली.

नकवींच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाचा नकार

नियमांनुसार स्पर्धेतील विजेत्याला (Asia Cup 2025) आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) अध्यक्षांच्या हस्ते ट्रॉफी दिली जाते. मात्र, भारतीय संघाने (Team India) पाकिस्तानचे गृहमंत्री, पीसीबीचे चेअरमन आणि ACC अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार दिला.भारतीय खेळाडूंनी भारत-पाकिस्तान (Ind Vs Pak) यांच्यातील तणावपूर्ण संबंध लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.कवींच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाचा नकार

ACC अध्यक्षांचा वादग्रस्त पवित्रा

भारतीय संघाने अमिरात क्रिकेट बोर्डाच्या उपाध्यक्षांच्या (Asia Cup Trophy Controversy) हस्ते ट्रॉफी दिली जावी, अशी मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करून मोहसीन नकवी स्वतःच ट्रॉफी घेऊन निघून गेले आणि आपल्या हॉटेलमध्ये थांबले. त्यांच्या या वर्तनामुळे वाद अधिक चिघळला आहे.

BCCIचा अल्टिमेटम

या प्रकारावर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत साइकिया यांनी नकवींना आपली चूक सुधारण्याची संधी देत लवकरात लवकर भारतीय संघाला ट्रॉफी सुपूर्द करण्याचं आवाहन केलं आहे. ऑक्टोबरपर्यंत ट्रॉफी परत न दिल्यास बीसीसीआय नोव्हेंबरमध्ये दुबई येथे होणाऱ्या आयसीसी परिषदेत औपचारिक तक्रार दाखल करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

अंतिम सामन्याचं चित्र

अंतिम सामन्यात भारताने टॉस जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पाकिस्तानने 20 षटकांत 146 धावा केल्या. 20व्या षटकापर्यंत प्रत्युत्तरात भारताने 147 धावा करून 5 गडी राखले आणि सामना जिंकला. मैदानावर भारताने पाकिस्तानला पराभूत करत पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलं. मात्र, विजेतेपदाच्या ट्रॉफीवरून निर्माण झालेल्या वादामुळे आशिया कपच्या यशस्वी स्पर्धेवर राजकीय सावली पडली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com