Yashasvi Jaiswal : जैस्वालनं अखेर कबूल केलं! कोण ती आहे? वैयक्तिक आयुष्यातील मोठा खुलासा

Yashasvi Jaiswal : जैस्वालनं अखेर कबूल केलं! कोण ती आहे? वैयक्तिक आयुष्यातील मोठा खुलासा

यशस्वी जैस्वालचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात त्याने त्याच्या वैयक्तिक जिवनातील त्याच्या लव्ह लाईफबद्दल मोठ वक्तव्य केलं आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

भारताचा युवा आणि सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल याने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत आपली भूमिका चोखपणे पार पाडली होती. टीम इंडियाचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वाल इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान चांगलाच चर्चेत आला होता. या मालिकेदरम्यान त्याच नाव इंग्लंडमधील रहिवासी मॅडी हॅमिल्टनशी जोडले गेले होते. मॅडीचा भाऊ हेन्री हॅमिल्टन हा यशस्वी जैस्वालचा खूप चांगला मित्र आहे.

इंग्लंड दौऱ्यादरम्यान त्या तिघांचे अनेक एकत्र फोटो पाहायला मिळाले. त्यामध्ये एका फोटोनंतर यशस्वी आणि मॅडी हॅमिल्टन यांच्यातील नात्याची अफवा मोठ्या प्रमाणात पसरत गेली. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते की, "वेळ निघून जाईल, पण नातेसंबंध कधीच कमी होणार नाहीत". ज्यामुळे चाहत्यांनी तर्क वितर्क लावण्यास अधिक जोर धरला. तसेच मॅडी आयपीएलमध्ये होणाऱ्या सामन्यात देखील यशस्वी जैस्वालला पाठिंबा देण्यासाठी अनेक वेळा स्टेडियममध्ये स्टँडवर पाहायला मिळाली आहे.

असं असताना यशस्वी जैस्वालचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात त्याने त्याच्या वैयक्तिक जिवनातील त्याच्या लव्ह लाईफबद्दल मोठ वक्तव्य केलं आहे. त्याच्या या पॉडकास्टमध्ये राज समानी यांनी जैस्वालला विचारले की तो कोणाशी डेट करत आहे का? यावर बोलताना यशस्वी जैस्वालने एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

त्याने उत्तर देत म्हटलं की, "नाही.... लोकांना जसं वाटत आहे तस काहीच नाही." यशस्वी जैस्वालने दिलेल्या या उत्तरामुळे सर्व अफवांना पूर्णविराम बसला आहे, तसेच सध्या सिंगल आहे आणि कोणालाही डेट करत नाही. दरम्यान यशस्वी जैस्वाल सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com