Asia Cup 2025 : टीम इंडियाची तयारी सुरू! सूर्यकुमार, बुमराहसह हार्दिक पांड्याला संघातून वगळणार? जाणून घ्या...
टीम इंडियाने अलीकडेच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली असून आता संघाचं लक्ष एशिया कप 2025कडे वळलेलं आहे. हि बहुप्रतिक्षित स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये पार पडणार आहे. भारताचा समावेश ग्रुप A मध्ये करण्यात आला असून त्याच्यासोबत पाकिस्तान, युएई आणि ओमान हे संघ असतील. भारताचे सामने अनुक्रमे 10 सप्टेंबरला युएई, 14 सप्टेंबरला पाकिस्तान आणि 19 सप्टेंबरला ओमान विरुद्ध होणार आहेत.
T20 संघाचा सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादव काही काळापूर्वी हर्नियाच्या शस्त्रक्रियेमुळे बाहेर गेला आहे. तो फिट होतोय मात्र अजूनही त्याच्या पूर्ण तंदुरुस्तीबाबत निश्चितता नाही. त्याचप्रमाणे प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही या स्पर्धेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे हे दोघे अनुभवी खेळाडू एशिया कपपासून दूर राहण्याची शक्यता आहे.
शुभमन गिल आणि यशस्वी जायसवाल यांसारखे युवा फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करत असून त्यांना या स्पर्धेत स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. तसेच साई सुदर्शन, तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि ध्रुव जुरेल यांचीही निवड होऊ शकते. संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांचाही अनुभव संघासाठी उपयुक्त ठरू शकतो.
ऑलराउंडर म्हणून हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर जबाबदारी देण्यात येऊ शकते. वेगवान माऱ्याची जबाबदारी अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांच्यावर असू शकते. फिरकी विभागात कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे दोन पर्याय महत्त्वाचे ठरू शकतात. वरुणने अलीकडे टी20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
संभाव्य भारतीय संघ (Asia Cup 2025):
यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, संजू सॅमसन, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज.