T20i World Cup : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये?

T20i World Cup : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये?

आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेनंतर आता काही महिन्यांनी मेन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांत वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चुरस असणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • T20 World Cup 2026 फायनल मुंबईत सामने होणार की नाहीत?

  • ..तर भारत-पाकिस्तान सामना कोलंबोत!

  • अंतिम सामना कोणत्या स्टेडियममध्ये होणार?

आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेनंतर आता काही महिन्यांनी मेन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांत वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चुरस असणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंकेकडे आहे. स्पर्धेचं वेळापत्रक येत्या काही दिवसात जाहीर होणार असल्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्समधून व्यक्त करण्यात आली होती. तसेच बीसीसीआय-आयसीसी यांच्यात झालेल्या बैठकीत भारतातील 5 आणि श्रीलंकेतील 3 शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन करण्यात येणार असल्याचा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

त्यानंतर आता या स्पर्धेला केव्हा सुरुवात होणार? तसेच उपांत्य फेरीतील 2 आणि अंतिम सामना कोणत्या स्टेडियममध्ये होणार? याबाबत अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्पर्धेतील पहिला आणि अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तर मुंबईत सेमी फायनलमधील 1 सामना होणार आहे. तसेच स्पर्धेचं आयोजन हे 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

..तर भारत-पाकिस्तान सामना कोलंबोत!

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात पहलगाम हल्ल्यानंतर संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे आता दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेतही एकमेकांविरुद्ध एकमेकांच्या घरच्या मैदानात खेळत नाहीत. दोन्ही संघांचे सामने हे त्रयस्थ ठिकाणी होतात. त्यामुळे पाकिस्तान आणि टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचले तर सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात. इंडियन एक्सप्रेसनुसार, भारत-पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहचल्यास तो सामना कोलंबोत होईल. तर उपांत्य फेरीतील दुसरा सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

तसेच भारतातील 5 शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने होणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात आहे. या 5 शहरांमध्ये मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि, चेन्नईचा समावेश आहे. तर श्रीलंकेत कोणत्या शहरात सामने होणार? हे निश्चित नाही.

टीम इंडिया गतविजेता

दरम्यान टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप गतविजेता आहे. भारतीय संघाने 2024 साली अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा थरारक झालेल्या सामन्यात धुव्वा उडवला आणि वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com