Yuvraj Singh: विराट-रोहितला ट्रोल करणाऱ्यांवर युवराज सिंगची प्रतिक्रिया, खेळाडूला वाईट बोलणं सोप पण....
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 च्या मालिकेची समाप्ती झाली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-1 या स्कोरने विजय मिळवत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. या विजयाने ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली असून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 च्या शर्यतीतूनही बाहेर झाली आहे. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांची निराशा केली.
यादरम्यान आता विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन अनुभवी खेळाडूंवर ट्रोलिंगचे जाळे टाकले जात आहेत. त्यांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या पराभवावर झालेल्या टीकेदरम्यान रोहित शर्माने विराट कोहलीचे समर्थन करत म्हटले आहे.
खेळाडूला वाईट बोलण सोप पण सपोर्ट करण कठीण-युवराज सिंग
गेल्या पाच-सहा वर्षात भारताने काय मिळवले आहे ते मी पाहिलं आहे... मला नाही वाटत कोणती टीम ऑस्ट्रेलियाकडून बॅक टू बॅक जिंकली असेल... आपण आपले जे ग्रेट खेळाडू आहेत विराट कोहली आणि रोहित शर्मा त्यांच्याबद्दल असं नाही बोलू शकत... त्यांच्याबद्दल खूप वाईट बोललं जात आहे त्यांना टॅोल केलं जात आहे... पण, लोक विसरत चालले आहेत की, त्यांनी भूतकाळात काय यश मिळवले आहे. या कालावधीतील ते सर्वोत्तम खेळाडू आहेत.
ठिक आहे! हरले पण आपल्यापेक्षा त्यांना ती गोष्ट दुखावत आहे... कोच म्हणून गौतम गंभीर, रोहित शर्मा, विराट रोहली आणि जस्प्रित बुमराह ते सर्वात चांगले खेळाडू आहेत सध्याच्या घडीला.... ज्यावेळेस खेळाडू चांगला खेळ खेलत नाही त्यावेळेस त्यांना वाईट बोलणं खूप सोप आहे पण त्यांना सपोर्ट करण कठीण आहे... त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे आणि त्यांचे योगदान पण जास्त आहे... त्यामुळे माझं काम आहे माझ्या भावांना मित्रांना सपोर्ट करतं राहण आणि मी करणार....
त्याने स्वत:चा विचार करण्याआधी.... - युवराज सिंग
मी अजून तरी माझ्या आजवरच्या कारकिर्दीत अजून एकदा ही असं पाहिलं नाही की, एका कर्णधाराचा खेळ चांगला नाही म्हणून त्याला बाहेर बसवलं गेललं आहे... यात रोहित शर्माचं कौतुक केलं पाहिजे की, त्याने स्वत:चा विचार करण्याआधी पहिला संघाचा विचार केला, त्यामुळे तो सर्वोत्तम कर्णधार आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही...