CWG 2022 : भारतीय हॉकी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश, पाच पदक निश्चित

CWG 2022 : भारतीय हॉकी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश, पाच पदक निश्चित

हॉकीमध्ये भारत आणि वेल्स यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीत भारताने वेल्सचा 4-1 असा पराभव केला. भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
Published by :
Team Lokshahi

नवी दिल्ली : हॉकीमध्ये भारत आणि वेल्स यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीत भारताने वेल्सचा 4-1 असा पराभव केला. भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यापूर्वी बॉक्सिंगमध्ये भारताच्या सागरने 92 किलो वजनी गटातही उपांत्य फेरी गाठली आहे. यामुळे भारताची पदके निश्चित झाली आहे.

जस्मिनने बॉक्सिंगमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. तत्पूर्वी, पुरुषांच्या 48 किलो- 51 किलो ओव्हर (फ्लायवेट) अमिल पंघल आणि लेनन मुलिगन यांच्यातील सामन्यात अमितने सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

याआधी हिमा दासने महिलांच्या 200 मीटरच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनेही प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. किदाम्बी श्रीकांतने युगांडाच्या डॅनियल वनाग्लियावर २१-९, २१-९ अशा सेटमध्ये सहज विजय मिळवला असून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

तेजस्वीन शंकरने कॉमनवेल्थमध्ये सहाव्या दिवशी पुरुषांच्या उंच उडीच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकले आहे. तर भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम सामन्यामध्ये कॅनडाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे, पुरुष हॉकी संघानेही पुरुष गटात कॅनडाचा 8-0 असा पराभव केला. बॉक्सर नीतू घंगासनेही भारताला किमान कांस्यपदकाची खात्री दिली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानेही अ गटातील त्यांच्या शेवटच्या सामन्यात बार्बाडोसचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com