Fifa World Cup 2022Team Lokshahi
क्रीडा
Fifa World Cup 2022 : बलाढ्य अर्जेंटिनाचा सौदी अरेबियाकडून पराभव
ग्रुप सी च्या मॅचमध्ये सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला 2-1 ने हरवलं.
कतारमध्ये सध्या अनेक वादासह फीफा वर्ल्ड कप 2022 सुरु आहे. मात्र आता या वर्ल्ड कप मधून एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. फुटबॉलमध्ये लिओनेल मेस्सीच्या बलाढ्य अर्जेंटिनाचा पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तो पराभव दुबळ्या समजल्या गेलेल्या सौदी अरेबियाकडून मिळाला आहे. ग्रुप सी च्या मॅचमध्ये सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला 2-1 ने हरवलं.
विशेष म्हणजे अर्जेंटिना संघाने कोपा अमेरिका ही मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर कमाल फॉर्म दाखवत खेळ केला होता. त्यांनी मागील 36 सामन्यांपासून पराभव पाहिला नव्हता. पण विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतच त्याला सलामीचा सामना गमवावा लागला आहे. सामन्यात अर्जेंटिनाकडून लिओनल मेस्सीने (10 मिनिटं) पेनल्टीच्या मदतीनं एक गोलं केला. तर सौदीकडून सालेह अल्सेरीनं (48 मिनिटं) आणि सालेम अल्डवेसरीनं (53 मिनिटं) गोलं केले.