पाऊस काही पाठ सोडेना! सामना रद्द झाल्यास 'या' दिवशी होणार CSK vs GT अंतिम लढत

पाऊस काही पाठ सोडेना! सामना रद्द झाल्यास 'या' दिवशी होणार CSK vs GT अंतिम लढत

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. परंतु, सामन्यापूर्वीच अहमदाबादमध्ये पाऊस सुरू झाला आहे.

अहमदाबाद : आयपीएल 2023 चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. परंतु, सामन्यापूर्वीच अहमदाबादमध्ये पाऊस सुरू झाला आहे. चाहते पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. परंतु, आज सामना होऊ शकला नाहीतर फायनलबाबत राखीव दिवसाचाही नियम आहे.

आयपीएलच्या अंतिम सामन्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अशा स्थितीत पावसामुळे 10.20 पर्यंत खेळ सुरू झाल्यास षटकांमध्ये कोणतीही घट होणार नाही. यानंतरही, पाऊस सुरुच राहिला तर 5-5 षटकांसाठी सामन्याची कट ऑफ वेळ 12.26 पर्यंत असेल. अशातही राखीव दिवस आता जाहिर करण्यात आला आहे. सोमवारचा दिवस म्हणजेच उद्या आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, राखीव दिनी म्हणजेच सोमवारीही पावसाने हजेरी लावल्यास गुजरात टायटन्सला विजयी घोषित केले जाऊ शकते. गुजरात टायटन्सने पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे, तर चेन्नई सुपर किंग्सने दुसरे स्थान मिळविले आहे. गुजरातने 14 पैकी 10 सामने जिंकले आणि 20 गुण मिळवले आणि 0.809 चा नेट-रन रेट होता. दुसरीकडे, सीएसकेने 14 पैकी 8 सामने जिंकले होते आणि त्यांचे 17 गुण होते. यानुसार सामना झालाच नाही तर गुजरात टायटन्सचा संघ विजेतेपद पटकावणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com