GT VS KKR: गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना पावसामुळे रद्द! गुजरात संघ प्लेऑफमधून बाहेर

GT VS KKR: गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना पावसामुळे रद्द! गुजरात संघ प्लेऑफमधून बाहेर

आयपीएल 2024 चा 63वा सामना गुजरात टायटन्सचा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्याविरोधात होणार होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार होता.
Published by :
Dhanshree Shintre

आयपीएल 2024 चा 63वा सामना गुजरात टायटन्सचा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्याविरोधात होणार होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार होता. परंतू अहमदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही.

पावसाने गुजरात टायटन्सच्या आशा धुळीस मिळवल्या. आता गुजरात टायटन्स हा संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. आयपीएलमधून प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा गुजरात टायटन्स हा तिसरा संघ ठरला आहे. याआधी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स सुद्धा बाहेर गेले आहेत. सामना रद्द झाल्यामुळे गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला प्रत्येकी एक गुण मिळाला. प्लेऑफच्या समीकरणात टिक्यासाठी गुजरातला 2 गुणांची गरज होती, मात्र सामना रद्द झाल्यामुळे आता एक गुण मिळाला आहे. गुजरात टायटन्सचे सध्या 13 सामन्यात 11 गुण आहेत आणि संघाचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबाद यांच्याशी खेळला जाणार आहे. गुजरात टायटन्सने हा सामना जिंकला तरी संघ जास्तीत जास्त 13 गुणांपर्यंत पोहचू शकेल.

सध्याच्या गुणतालिकेत, आधीच चार संघांचे 14 किंवा त्याहून अधिक गुण आहेत. अशा परिस्थितीत गुजरात टायटन्स हा संघ बाहेर आहे. कोलकाता संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. आता प्लेऑफमध्ये पोहोचण्याची स्पर्धा सहा संघांमध्ये आहे. अजूनही तीन जागा रिक्त आहेत. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे स्पर्धेतील संघ आहेत. सामना रद्द झाल्यानंतर गुजरातच्या खेळाडूंनी लॅपऑफ ऑनरचे प्रदर्शन केले. त्यांनी मैदानात फिरून चाहत्यांचे आभार मानले आणि त्यांचे आभार मानले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com