रोहित शर्माचा पत्ता कट? हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार

रोहित शर्माचा पत्ता कट? हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार

मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 च्या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 च्या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या जागी आता हार्दिक पांड्याला मुंबईचा कर्णधार बनवण्यात आले आहे. याबाबत मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन घोषणा करण्यात आली आहे.

हार्दिक पांड्याची काही दिवसांपुर्वीच मुंबई इंडियन्समध्ये वापसी झाली आहे. पण त्यासाठी मुंबईनं कॅमेरुन ग्रीनला रिलीज केलं. याआधी पांड्या याआधी गुजरात टायटन्सकडून खेळत होता. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात चॅम्पियनही झाला होता. हार्दिकच्या पुनरागमनामुळे त्याच्यावर आता कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

रोहित शर्मा हा मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ पाच वेळा चॅम्पियन बनला. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद पटकावले. रोहितची आयपीएलमधील वैयक्तिक कामगिरी पाहिली तर तीही उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 243 सामन्यात 6211 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने एक शतक आणि 42 अर्धशतके केली आहेत. रोहितने एप्रिल 2008 मध्‍ये करिअरचा पहिला आयपीएल सामना खेळला. डेकर चार्जेसकडून खेळताना रोहितने पदार्पण केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com