Hardik Pandya: आयपीएलच्या आधीच हार्दिकचा कहर! सुल्तानच्या एका ओव्हरमध्ये 28 धावांचा पाऊस, तर 52व्या चेंडूत संपवला सामना
आयपीएल 2025च्या सामन्यात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळणार असल्याचं उघडकीस झालं आहे. तर आयपीएलच्या आधीच हार्दिक पांड्याने त्याची धुवाधार खेळी पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना दाखवली आहे. हार्दिक पांड्या सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला त्याची उत्कृष्ट खेळी पुन्हा एकदा क्रिकटप्रेमींना पाहायला मिळाली आहे. हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत आहे. बडोद्याकडून हार्दिकची चमकदार कामगिरी सुरुच आहे.
तर आज 29 नोव्हेंबरला हार्दिकने त्रिपुराविरुद्ध 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. हार्दिकने 23 चेंडूत 47 धावांची खेळी खेळत असताना, 3 चौकार आणि 5 षटकार लगावले. यावेळी हार्दिकचा स्ट्राइक रेट 204.35 होता. हार्दिकने अलीकडेच बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या त्यावेळी भारताकडून त्याची शानदार कामगिरी पाहायला मिळाली. हार्दिकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गुजरातविरुद्ध नाबाद 74 धावा केल्या होत्या. तर उत्तराखंडविरुद्ध 41 धावांची खेळी खेळली आणि तामिळनाडूविरुद्ध हार्दिकने 69 धावा केल्या होत्या अशी अप्रतिम कामगिरी हार्दिकने केली आहे.
हा सामना खेळत असताना बडोदाचे नेतृत्व कृणाल पांड्या करत होता. यावेळी त्रिपुराने सर्वप्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 109 धावा केल्या आणि मनदीप सिंगने 40 चेंडूत 50 धावांची खेळी खेळली. तर मिथलेश पालने 24 चेंडूत 37 धावांची खेळी खेळली असता, हार्दिकने 47 धावा केल्या त्यामुळे बडोद्याने हा सामना 7 गडी राखून जिंकला. तर सुल्तानच्या एका ओव्हरमध्ये 28 धावांचा पाऊस पाडत हार्दिकने 52व्या चेंडूत संपवला.