WPL 2026
क्रीडा
WPL 2026: मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने ठोकले ऐतिहासिक शतक; RCB वर २०० धावांचे आव्हान
Mumbai Indians: WPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सच्या स्कायव्हर-ब्रंटने ऐतिहासिक शतक ठोकले, ५७ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. RCB ला विजयासाठी २०० धावांचे आव्हान दिले.
वुमन्स प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या १६व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून १९९ धावा केल्या. विजयासाठी RCB ला २०० धावांचे मोठे आव्हान दिले गेले. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या नॅट स्कायव्हर-ब्रंटने इतिहास रचला. WPL च्या चौथ्या पर्वात तिने स्पर्धेतील पहिले शतक ठोकले, जे आतापर्यंतच्या तीन पर्वांत कोणालाही करता आले नव्हते.
