INDW VS AUSW: भारतीय क्रिकेट महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी! ऑस्ट्रेलियावर 8 विकेटनी शानदार विजय

INDW VS AUSW: भारतीय क्रिकेट महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी! ऑस्ट्रेलियावर 8 विकेटनी शानदार विजय

Indian Women’s Blind Cricket Team: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथमच ऑस्ट्रेलियाचा कसोटीमध्ये पराभव केला आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथमच ऑस्ट्रेलियाचा कसोटीमध्ये पराभव केला आहे. टीम इंडियाने चौथ्या दिवशी आठ गडी राखून हा विजय मिळवला आहे. पहिल्या डावात भारतीय महिला संघाने 406 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा केल्या. टीम इंडियाकडे पहिल्या डावात 187 धावांची आघाडी होती. त्यानंतर फॉलनंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात 261 धावा केल्या. यामुळे भारताला 75 धावांचे लक्ष्य मिळालं होतं. टीम इंडियाने हे लक्ष्य दोन गडी गमावून पूर्ण करत ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला.

स्मृती मानधनाने दुसऱ्या डावात भारताकडून सर्वाधिक नाबाद 38 धावा केल्या. रिचा अंजनाने 13 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज 12 धावांवर नाबाद राहिली. शफाली वर्माला केवळ ४ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून किम गर्थ आणि अ‍ॅशले गार्डनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताला पहिला विजय मिळाला आहे. दोन्ही संघांमध्ये १९७७ पासून आतापर्यंत 11 कसोटी सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. सहा कसोटी अनिर्णित राहिल्या आणि आता भारताला एक विजय मिळाला.

भारतीय संघाने वर्ष 2023 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. पण टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सन 2023 मध्ये भारताने 35 सामने खेळले असून त्यापैकी 27 सामने भारताने जिंकले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातील विजयाचाही समावेश आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन संघाने 1999 मध्ये 37 एकदिवसीय सामने खेळले, त्यापैकी 26 ऑस्ट्रेलियाने जिंकले. अशाप्रकारे भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 वर्षे जुना विक्रम मोडला आहे.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 8 गडी राखून जिंकला. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसरा एकदिवसीय सामना 8 गडी राखून जिंकून शानदार पुनरागमन केले, मात्र आता टीम इंडियाने तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 78 धावांनी जिंकला आहे. यासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या सामन्यात भारताकडून संजू सॅमसनने अप्रतिम कामगिरी केली. त्याने 108 धावांची तुफानी खेळी केली. त्याचे हे वनडे क्रिकेटमधील पहिले शतक आहे. टिळक वर्माने 52 धावांचे योगदान दिले. याशिवाय अर्शदीप सिंगने संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्याने 10 विकेट घेतल्या होत्या. याच कारणामुळे त्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com