Rohit Sharma
HITMAN MODE ON! ROHIT SHARMA SMASHES EXPLOSIVE CENTURY IN VIJAY HAZARE TROPHY COMEBACK

Rohit Sharma: हिटमॅन’ मोड ऑन! पहिल्याच सामन्यात ठोकलं दमदार शतक

Mumbai Cricket: विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने झंझावाती शतक झळकावत दमदार कमबॅक केला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याने अनेक वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दणक्यात कमबॅक केला आहे. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर मुंबई आणि सिक्कीम यांच्यातील सामन्यात रोहितने विजयी धावांचा पाठलाग करताना झंझावाती शतक ठोकले. रोहितची फटकेबाजी पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी झाली, मात्र सामना लाईव्ह दाखवला नसल्याने टीव्हीसमोरच्या चाहत्यांना निराशा सहन करावी लागली.

सिक्कीमने प्रथम फटका करत मुंबईसमोर २३७ धावांचे आव्हान ठेवले. पाठलाग करताना रोहित आणि अंगक्रिष रघुवंशी ही सलामी जोडी मैदानावर उतरली. रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आणि सिक्कीमच्या गोलंदाजांवर बॅटने तुटून पडला. अंगक्रिषने सातत्याने एकेरी धावा घेत रोहितला स्ट्राईक दिली, ज्यामुळे रोहितने अवघ्या २८ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले.

अर्धशतकानंतरही रोहितची फटकेबाजी थांबली नाही. दोघांनी सलामी शतकी भागीदारी रचली, जी ११८ चेंडूंमध्ये १४१ धावांची झाली. अंगक्रिषने ५८ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या, मात्र रोहित शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो आऊट झाला. त्यानंतर डेब्यूटंट मुशीर खानसोबत रोहितने शतक पूर्ण केले. रोहितने ६२ चेंडूंत हे शतक साकारले, ज्यात ८ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. १६२ च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या या लिस्ट ए क्रिकेटमधील रोहितच्या ३७ व्या शतकाने मुंबईला सोपी विजय मिळवून दिला.

रोहितच्या या तडाख्यामुळे न्यूझीलंडचे टेन्शन वाढले आहे. टीम इंडिया नववर्षात मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध ११ जानेवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार असून, या कामगिरीने चाहत्यांना रोहितकडून अशाच धमाक्याची अपेक्षा आहे. हिटमॅन पुन्हा जागतिक स्पर्धेत धडक मारेल का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com