हैदराबाद ईगल्सकडे पहिल्या T10 महिला कर्णबधिर प्रीमियर लीगचे विजेतेपद

हैदराबाद ईगल्सकडे पहिल्या T10 महिला कर्णबधिर प्रीमियर लीगचे विजेतेपद

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित IDCA ची पहिली T10 महिला कर्णबधिर प्रीमियर लीग ट्रॉफी हैदराबाद ईगल्सने युपी वॉरियर्सचा 5 गडी राखून पराभव करत जिंकली.
Published by :
Team Lokshahi

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (सायरस पूनावाला गट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित IDCA ची पहिली T10 महिला कर्णबधिर प्रीमियर लीग ट्रॉफी हैदराबाद ईगल्सने युपी वॉरियर्सचा 5 गडी राखून पराभव करत जिंकली. सायरस पूनावाला ग्रुपचा भाग असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

ब्रिटीश डेप्युटी हाय कमिशन कॅथरीन बार्न्स म्हणाल्या की, संपूर्ण भारतातील या अद्भुत अशा कर्णबधिर महिला खेळाडूंना क्रिकेट खेळताना पाहणे हा एक प्रेरणादायी अनुभव होता. खेळातील समानता आणि विविधतेचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे, ज्याचा संपूर्ण समाजाला फायदा होतो. ब्रिटन देश हा जीवनातील विविध पैलूंचा खंबीर पुरस्कर्ता आहे आणि तेच आज याठिकाणी पाहून माझा आनंद दुप्पट झाला आहे. खेळाचे असे विलक्षण कौशल्य दाखविल्याबद्दल सर्व सहभागी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.

IDCA चे अध्यक्ष सुमित जैन म्हणाले, मी हैदराबाद ईगल्सला त्यांच्या मैदानावरील दैदीप्यमान कामगिरीबद्दल शुभेच्छा देतो. ही एक चित्तथरारक स्पर्धा होती ज्यामध्ये प्रत्येकाने खेळाच्या मैदानावर आपल्या सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले. जिंकणे आणि हारणे हा खेळाचा भाग आहे.

विजेत्या संघ हैदराबाद ईगल्सला ट्रॉफी आणि 1 लाख रुपये विजयी पारितोषिक म्हणून देण्यात आले, तर उपविजेत्या यूपी वॉरियर्सला त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. याव्यतिरिक्त, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि सुपर षटकार यासह विविध श्रेणीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळाडूंना रोख पारितोषिके मिळाली. डेफ मुंबई स्टार्सच्या निदा शेखने वुमन ऑफ द सिरीज, डेफ यूपी वॉरियर्सच्या दीप्ती मौर्य - सर्वोत्कृष्ट गोलंदाज, डेफ हैदराबाद ईगल्सची रिंकी - सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि डेफ यूपी वॉरियर्सची बी धनलक्ष्मी - सुपर षटकार यांना गौरविण्यात आले.

या चार दिवसीय स्पर्धेत, सहा विशेष दिव्यांग महिला संघ पंजाब लायन्स, यूपी वॉरियर्स, मुंबई स्टार्स, दिल्ली बुल्स, हैदराबाद ईगल्स आणि बंगलोर बादशाह विजेतेपदासाठी एकमेकांशी लढले. त्यांनी एकूण 11 सामने खेळले आणि दोन सर्वोत्तम संघ अंतिम सामन्यात आमनेसामने आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com