ICCचा मोठा निर्णय! श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं निलंबन; आता एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकणार नाही

ICCचा मोठा निर्णय! श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं निलंबन; आता एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकणार नाही

क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Published by  :
shweta walge

क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं सदस्यत्व निलंबित केलं आहे. श्रीलंकन सरकारचा बोर्डामध्ये हस्तक्षेप वाढल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ICCच्या म्हणण्यानुसार?

आयसीसी बोर्डाची आज बैठक झाली या बैठकीत श्रीलंकेच्या बोर्डावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डानं आयसीसीचा एक सदस्य म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांचं उल्लंघन केलं असल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com