ICC World Cup 2023 : आयसीसीने वर्ल्डकपचे बदलले वेळापत्रक; या दिवशी रंगणार भारत - पाकिस्तानचा सामना

ICC World Cup 2023 : आयसीसीने वर्ल्डकपचे बदलले वेळापत्रक; या दिवशी रंगणार भारत - पाकिस्तानचा सामना

वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाक सामना ‘या’ दिवशी रंगणार.
Published by :
Team Lokshahi

आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेसाठी २७ जुलै रोजी वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली होती.

तर स्पर्धेतील बहूप्रतिक्षीत भारत - पाकिस्तान सामन्याचे आयोजन १५ ऑक्टोबर रोजी केले जाणार होते. मात्र या सामन्याच्या तारखेत बदल केला आहे. आता भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.

आयसीसीने 13 व्या वनडे वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार 46 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. या वर्ल्ड कपची सुरुवात गतविजेता इंग्लंड आणि गतवर्षीचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना 5 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरूद्ध रंगणार आहे. तर बहुप्रतिक्षित आणि कॉंटे की टक्कर वाला भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपचा फायनल सामना हा नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे.

2019 च्या वनडे वर्ल्ड कपप्रमाणे यंदा सुद्धा सामने राऊंड रॉबिन लीगप्रमाणे खेळवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक संघ एक दुसऱ्या संघाविरूद्ध एक-एक सामने खेळणार आहे. यानंतर ग्रुज स्टेजमध्ये टॉप चार संघ सेमी फायनलमध्ये आमने सामने येतील. पहिला सेमी फायनल सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. तर दुसरा सेमी फायनल सामना हा 16 नोव्हेंबर रोजी कोलकत्ताच्या ईडन गार्डन मैदानावर रंगणार आहे. त्यामुळे जर टीम इंडियाने सेमी फायनलसाठी क्वालिफाय केल्यास त्यांचा सामना मुंबईत खेळवला जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com