ICC ODI World Cup Schedule : आज जाहीर होणार वर्ल्ड कप शेड्यूल

ICC ODI World Cup Schedule : आज जाहीर होणार वर्ल्ड कप शेड्यूल

वर्ल्ड कपचे आयोजक भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने काही दिवसांपूर्वी आयसीसीला ड्राफ्ट शेड्यूल पाठवून दिलं होतं.
Published by :
Siddhi Naringrekar

वर्ल्ड कपचे आयोजक भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने काही दिवसांपूर्वी आयसीसीला ड्राफ्ट शेड्यूल पाठवून दिलं होतं. या वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या टीम्सनाही वर्ल्ड कपच ड्राफ्ट शेड्यूल पाठवलं आहे.  शेड्युलवरुनच भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही? ते स्पष्ट होईल. आज मंगळवार 27 जून रोजी आयसीसीकडून वर्ल्ड कप शेड्यूलची घोषणा करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

2011 नंतर भारत पुन्हा एकदा वर्ल्ड कपच यजमानपद भूषवणार आहे. ICCने अजूनपर्यंत या स्पर्धेच शेड्यूल जाहीर केलेलं नाही. ड्राफ्ट शेड्यूलनुसार वर्ल्ड कपची सुरुवात पाच ऑक्टोबरला होईल आणि फायनल मॅच 19 नोव्हेंबरला खेळली जाईल. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com