ICC World Cup 2023 Schedule : प्रतिक्षा संपली; क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

ICC World Cup 2023 Schedule : प्रतिक्षा संपली; क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

क्रिकेट प्रेमींची प्रतिक्षा आता संपली आहे. क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

क्रिकेट प्रेमींची प्रतिक्षा आता संपली आहे. क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे.

5 ऑक्टोबर रोजी स्पर्धा सुरू होणार आहे.पहिला सामना अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि गतवर्षीचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणार आहे. वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबरला रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

भारतीय संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. तर दुसरा उपांत्य सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये 48 सामने खेळल्या जाणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकपचा उद्घाटन आणि अंतिम सामना खेळल्या जाणार आहे. तर उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहे.

भारताचे विश्वचषक 2023 चे वेळापत्रक

8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

11 ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

15 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला

29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ

2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई

5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

11 नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळुरू

Admin
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com