IND vs AUS : गाबा कसोटीवर पावसानं घातला गोंधळ! दुसऱ्या दिवशी सामन्याची वेळ काय?
आजासून ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांमधील तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या नाणेफेकी दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या दिशेने लागला.मात्र तिथे पावसाने खोडा घातल्याच पाहायला मिळालं आहे.
तिथे नाणेफेकी दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण झाले होते आणि काही वेळातच पावसाच्या अडचणीमुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. ज्यामुळे हा डाव अवघ्या 13.2 षटकांचा झाला. ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळाची सुरुवात करण्यासाठी उस्मान ख्वाजा आणि मॅकस्विनी ही जोडी रिंगणात उतरली आणि पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाला बिनबाद २८ धावा करण्यात आल्या. अचानक पावसाची हजेरी पाहता आता पंचांनी या सामन्याच्या शेवटच्या चार दिवसांच्या सुरुवातीच्या वेळेत बदल जाहीर केले आहेत.
या वेळेत होईल सामना सुरु
पुढील चार दिवसांचा खेळ पूर्वी पहाटे 5:50 वाजता सुरू होणार होता असा न होता, तो आता भारतीय वेळेनुसार पहाटे 5:20 वाजता सुरू होईल. म्हणजेच दुसऱ्या दिवशी सामना अर्धा तास आधी सुरू होईल तसेच गाबा कसोटी सामन्याच्या शेवटच्या चार दिवसांत एकूण 98 षटकं टाकली जातील. अशी माहिती बीसीसीआयने ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.