IND vs ENG : बुमराहचं ‘शतक’

IND vs ENG : बुमराहचं ‘शतक’

Published by :

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी (India vs England 4th Test) भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah)विक्रमाला गवसणी घातली आहे. ओली पोपला (Ollie Pope) बोल्ड करत बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये 100 विकेटचा पल्ला गाठला आहे.

त्याने पहिले पोपला आणि मग जॉनी बेयरस्टोला (Jonny Bairstow) आपल्या रिव्हर्स स्विंगवर बोल्ड केलं. बुमराह टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 100 विकेट घेणारा भारतीय फास्ट बॉलर ठरला आहे. आपल्या 24 व्या टेस्टमध्येच त्याला 100 वी विकेट मिळाली.

याआधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी 25 टेस्टमध्ये 100 विकेट मिळवल्या. तर इरफान पठाणने 28, मोहम्मद शमीने 29, जवागल श्रीनाथने 30 आणि इशांत शर्माने 33 टेस्टमध्ये 100 विकेटचा टप्पा गाठला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com