IND vs ENG: U19 World Cup Final मध्ये वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम! ‘हा’ विक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
हरारे येथील स्पोर्ट्स क्लब मैदानावर उ-१९ विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात जोरदार लढत सुरू आहे. भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून, स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशीने दमदार अंदाजात खेळत इतिहास रचला आहे.

वैभव सूर्यवंशी हा या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला. सामना सुरू झाल्यावर सलामीवीर आरोन जॉर्ज ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी १४२ धावांची शानदार भागीदारी रचली. म्हात्रेने ५१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावा केल्या, पण अॅलेक्स ग्रीनने त्याला बाद केले.
वैभवने मात्र ५५ चेंडूत शतक पूर्ण करत इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. शतकानंतर तो अधिक आक्रमक झाला आणि दुहेरी शतकाकडे वाटचाल करत असताना मॅनी लुम्सडेनने १७५ वर त्याला बाद केले. या खेळीने भारताला मजबूत आधार दिला आहे.
उ-१९ विश्वचषक फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम
८० चेंडूत १७५ धावा; १५ चौकार, १५ षटकार
उ-१९ वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकारांचा जागतिक विक्रम
भारतासाठी फायनलमध्ये भक्कम धावसंख्या उभारली