क्रीडा
IND vs PAK : भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची उपांत्य फेरी गाठली आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची उपांत्य फेरी गाठली आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा समाना एकतर्फी जिंकला. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे.
भारताने पाकिस्तानचा 4-0 ने पराभव केलाभारतानं हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पुन्हा पटकावले आहे.या सामन्यापूर्वी भारतीय हॉकी संघानं दक्षिण कोरियाचा पराभव केला होता.भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे.
टीम इंडिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 च्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. याच्याआधी भारतीय संघाने मलेशियाचा 5-0 असा पराभव केला होता.