Ind vs Pak ICC World Cup : भारतीय गोलंदाजासमोर पाकिस्कानचं लोटांगण

Ind vs Pak ICC World Cup : भारतीय गोलंदाजासमोर पाकिस्कानचं लोटांगण

भारताच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सेनापती बाबर आझम तंबूत परतल्यानंतर इतर सैनिकांनी भारताच्या गोलंदाजीपुढे शरणागती पत्कारली.
Published by :
shweta walge

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 191 धावांवर ऑलआऊट करत रोखलंय. सेनापती बाबर आझम तंबूत परतल्यानंतर इतर सैनिकांनी भारताच्या गोलंदाजीपुढे शरणागती पत्कारली. वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान आज आमने-सामने आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शमा याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी हा निर्णय अचूक ठरवला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 191 धावांवर ऑलआऊट करत रोखलंय. मुळे आता टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांचं आव्हान मिळालं आहे. 

पाकिस्तानचा संपूर्ण संघ 42.4 षटकात 191  धावांपर्यंत मजल मारु शकला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम याने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. त्याशिवाय मोहम्मद रिजवान याने 49 धावांचे योगदान दिले. भारताकडून बुमराह, सिराज, हार्दिक अन् कुलदीप यांनी भेदक मारा केला. भारताला विजयासाठी 192 धावांचे आव्हान आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com