IND vs PAK: कोलंबोमध्ये रंगणार भारत-पाक सामना, जाणून घ्या अंतिम प्लेइंग ११, हेड-टू-हेड आकडेवारी
रविवारी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज टी-२० सामना रंगणार आहे. दोन्ही संघ स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असून गट अ मध्ये अव्वल दोन स्थानांवर विराजमान आहेत. भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेचा २९ धावांनी आणि दुसऱ्या सामन्यात नामिबियाचा ९३ धावांनी पराभव करून चार गुणांसह +३.०५० नेट रन रेटने आघाडी घेतली आहे.
पाकिस्ताननेही प्रथम नेदरलँड्सचा रोमांचक सामन्यात आणि नंतर अमेरिकेविरुद्ध मोठा विजय मिळवत +०.९३२ नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. या महामुकाबल्यापूर्वी ऐतिहासिक आकडेवारी पाहता भारत आणि पाकिस्तान १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमनेसामने आले असून भारत १३-३ ने आघाडीवर आहे. टी-२० विश्वचषकात हे अंतर आणखी वाढले असून आठ सामन्यांमध्ये भारताने ७-१ ने वर्चस्व गाजवले आहे.
या सामन्याने गट अ ची अंतिम अवस्था ठरेल आणि दोन्ही संघ सुपर-८ साठी तयारीत आहेत. कोलंबोच्या मैदानावर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून हवामान आणि पिच परिस्थिती भारताच्या फायदेशीर ठरू शकते. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाज आणि भारताच्या आक्रमक फलंदाजीमुळे हा सामना अविस्मरणीय होण्याची शक्यता आहे.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत (संभाव्य इलेव्हन): अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव , शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
पाकिस्तान (संभाव्य XI): सैम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा (कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान (यष्टीरक्षक), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, उस्मान तारिक, अबरार अहमद.
