IND vs Pak
IND VS PAK T20 2026: COLOMBO WEATHER THREATENS HIGH-VOLTAGE MATCH, RAIN ALERT

IND vs Pak: कोलंबोत सध्या ढगाळ हवामान, भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट

Colombo Weather: कोलंबोतील IND vs PAK टी-२० सामना पावसाच्या सावटाखाली; ५०-६०% पावसाची शक्यता, सुपर सॉपर उपलब्ध. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना १-१ गुण.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वाधिक प्रतीक्षित भारत-पाकिस्तान सामन्यावर कोलंबोमधील पावसाने संकट मांडले आहे. आज रविवारी संध्याकाळी ७ वाजता आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या हाय-व्होल्टेज मुकाबल्यासाठी दोन्ही संघ तयारीत असले तरी श्रीलंका हवामान विभागाने पूर्ण दिवस पावसाचा इशारा दिला असून शनिवारचा जोरदार पाऊस हा अंदाज बरोबर ठरला आहे.

स्पर्धेला सुरुवातीला पाकिस्तानने राजकीय कारणांमुळे नकार दिला होता, पण आता मंजुरी मिळाल्यानंतर सामना निश्चित झाला असला तरी पावसाची ५० ते ६० टक्के शक्यता सांगितली जात असून संध्याकाळी ६ ते ८ वाजे दरम्यान मुसळधार आणि वादळी पावसाचा धोका आहे. प्रेमदासा मैदानावर सुपर सॉपर उपलब्ध असले तरी जर पूर्णपणे रद्द झाला तर दोन्ही संघांना १-१ गुण मिळतील, ज्यामुळे भारत सुपर-८ मध्ये पक्का पाठबळी तर पाकिस्तानला आणखी विजयाची गरज पडेल.

दोन्ही संघ अपराजित असून गट अ मध्ये आघाडीवर आहेत, त्यामुळे चाहत्यांना हा रोमांचक सामना मिळेल की पावसाने हिरावून घेईल याबाबत उत्सुकता आहे. आयसीसी आणि आयोजक डकवर्थ लुईस नियम लागू करून सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील, पण हवामान अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटप्रेमी प्रार्थना करीत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com