IND vs SA 3rd Odi
IND vs SA 3rd Odi

IND vs SA 3rd ODI : रोमांचक टक्कर! टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, कोण जिंकणार फायनल मॅच?

3rd ODI Final Match: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकाची एकदिवसीय मालिका 1-1 ने बरोबरीत आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. भारताने रांचीत पहिले सामनं जिंकलं, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने कसोटी जिंकून बरोबरी साधली. आता मालिकेचा निर्णायक सामना खेळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. टीम इंडियाचे नेतृत्व केएल राहुलकडे असून, दक्षिण आफ्रिकाचे टेम्बा बवुमा सांभाळणार आहेत. अंतिम सामना कधी आणि कुठे होईल, ते पाहायला उत्सुकता आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना कधी?

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना शनिवार, 6 डिसेंबर रोजी होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना कुठे?

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान तिसरा सामना विशाखापट्टणमच्या ACA-VDCA क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे.

तिसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान तिसऱ्या सामन्याची सुरुवात दुपारी 1:30 वाजता होणार आहे, तर नाणेफेकीचा निर्णय 1 वाजता होईल, ज्याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा तिसरा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

तसेच हा सामना तुम्हाला मोबाईलवर पाहायचा असेल तर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com