IND vs SA
IND VS SA U19: VAIBHAV SURYAVANSHI MASTERSTROKE SHOCKS SOUTH AFRICA

IND vs SA : कॅप्टन सूर्यवंशीच्या हुशारीमुळे दक्षिण आफ्रिकेला धक्का, क्रिकेटपटूंचा मास्टरस्ट्रोक

Indian Cricket: कॅप्टन वैभव सूर्यवंशीच्या हुशारीमुळे भारत अंडर-१९ संघाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या सामन्यात झटका दिला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

आयुष म्हात्रे याच्या अनुपस्थितीत वैभव सूर्यवंशी सूर्यवंशी नेतृत्व करत असलेल्या अंडर-१९ टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये पहिला सामना जिंकून चांगली सुरुवात केली. पहिल्या सामन्यात वैभवला बॅटिंगमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही, तरी त्याच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड नोंदला गेला. आता दुसऱ्या सामन्यात वैभवने कर्णधार म्हणून जबरदस्त नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे.

दुसऱ्या सामन्यापूर्वी वैभवने प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला. पहिल्या सामन्यात स्थान मिळालेले हेनिल पटेल याच्या जागी किशन सिंहला संधी दिली. हा वैभवचा निर्णय निर्णायक ठरला. किशनने आपल्या गोलंदाजीत कमाल करत कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवला.

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंग निवडली. त्यांची सलामी जोडीने ३५ धावांपर्यंत एकही विकेट गमावली नाही. मात्र, किशन सिंग्हने यानंतर टॉप ऑर्डरवर हल्ला चढवला. त्याने २२ धावांत ३ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला बॅकफुटवर ढकलले.

किशनने प्रथम अदनानला बाद केले, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये जोरिचला झटका दिला. सलामी जोडी पॅक अप झाल्यावर किशनने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराची विकेट घेत स्कोअर ३५-० वरून ५७-३ केला. वैभवच्या या धोरीमुळे भारताने सामन्यात वरचढी मिळवली आहे. सीरिजमधील तिसरा सामना लवकरच होईल, ज्यात वैभवकडून आणखी चमक अपेक्षित आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com