श्रीलंकेचा भारतावर विजय; भारताचा 16 धावांनी केला पराभव

श्रीलंकेचा भारतावर विजय; भारताचा 16 धावांनी केला पराभव

भारत आणि श्रीलंका यांच्या तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारत आणि श्रीलंका यांच्या तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर आता श्रीलंकेनेही भारताचा 16 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचे सलामीवीर पथुम निसंका आणि कुशल मेंडिस यांनी जबरदस्त अशी सुरुवात करून दिली होती. दोघांनी 80 धावांची भागिदारी केली. पण युझवेंद्र चहलने कुशल मेंडिसला बाद करून ही जोडी फोडली. मेंडिसने 31 चेंडूत 52 धावा केल्या.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारताचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारतासमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाला आठ विकेट्स गमावून केवळ १९० धावाच करता आल्या.श्रीलंकेने ठेवलेल्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पॉवर प्ले मध्ये भारताने खराब फलंदाजी केली. सलामीवीर इशान किशन, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी आणि दिपक हुड्डा यांना दोन आकडी धावसंख्या देखील करता आली नाही.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचे सलामीवीर पथुम निसंका आणि कुशल मेंडिस यांनी जबरदस्त अशी सुरुवात करून दिली होती. दोघांनी 80 धावांची भागिदारी केली. पण युझवेंद्र चहलने कुशल मेंडिसला बाद करून ही जोडी फोडली. मेंडिसने 31 चेंडूत 52 धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात उमरान मलिकने भानुका राजपक्षेला 2 धावांवर त्रिफळा उडवत तंबूत धाडले. तर 12 व्या षटकात अक्षर पटेलने पथुम निसंकाला राहुल त्रिपाठीकडे झेल देण्यास भाग पाडले. तर त्यानतंर पुन्हा अक्षर पटेलनेच धनंजय डिसिल्वाला अवघ्या तीन धावांवर बाद केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com