श्रीलंकेविरु्दध भारतीय फलंदाजांची चमकदार खेळी; विजयासाठी दिलं तगडं आव्हान

श्रीलंकेविरु्दध भारतीय फलंदाजांची चमकदार खेळी; विजयासाठी दिलं तगडं आव्हान

श्रीलंकेविरु्दध पुन्हा भारतीय फलंदाजांची चमकदार खेळी केली आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. विराट, शुभमनचं शतक थोडक्यात हुकलं.

मुंबई : श्रीलंकेविरु्दध पुन्हा भारतीय फलंदाजांची चमकदार खेळी केली आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 358 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 50 षटकात 8 विकेट गमावत 357 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. विराट, शुभमनचं शतक थोडक्यात हुकलं. लंकेच्या दिलशान मधुशंकाची जबरदस्त गोलंदाजी केली.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रोहित शर्माची दिलशान मधुशंकाने विकेट घेतली. मात्र यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शानदार भागीदारी केली. विराट कोहलीने 94 चेंडूत 88 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार मारले. याशिवाय शुभमन गिलने 92 चेंडूत 92 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले.

शुभमन गिलला बाद करून दिलशान मधुशंकाने ही भागीदारी तोडली. यानंतर विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयस अय्यरने शेवटच्या षटकांमध्ये शानदार फलंदाजी केली. श्रेयस अय्यरने 56 चेंडूत 82 धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी रवींद्र जडेजा 24 चेंडूत 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय अष्टपैलू खेळाडूने आपल्या खेळीत 1 चौकार आणि 1 षटकार लगावला.

श्रीलंकेसाठी दिलशान मधुशंका सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. दिलशान मधुशंकाने 5 भारतीय फलंदाजांची विकेट घेतली. दिलशान मधुशंकाने 10 षटकात 80 धावा देत 5 बळी घेतले. रोहित शर्माशिवाय दिलशान मधुशंकाने शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केले. दुष्मंथा चमीराला 1 यश मिळाले. याशिवाय रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी धावबाद झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com