IND VS AFG: वर्ल्ड कपमध्ये आज भारत-अफगाणिस्तान आमने-सामने; गिलच्या जागी खेळणार हा खेळाडू

IND VS AFG: वर्ल्ड कपमध्ये आज भारत-अफगाणिस्तान आमने-सामने; गिलच्या जागी खेळणार हा खेळाडू

WORLD CUP 2023 मध्ये बुधवारी 11 ऑक्टोबर रोजी भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल.
Published by :
Team Lokshahi

WORLD CUP 2023 मध्ये बुधवारी 11 ऑक्टोबर रोजी भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल. नाणेफेक दुपारी 1.30 वाजता होईल. टीम इंडियाचा नियमित सलामीवीर शुभमन गिल डेंग्यूमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. रोहित शर्मासह त्याच्या जागी ईशान किशन सलामी देण्याची शक्यता आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

टीम इंडिया पुन्हा एकदा त्यांचा स्टार सलामीवीर शुभमन गिलशिवाय मैदानात उतरणार आहे. शुभमन गिल आजारपणामुळे वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यातून बाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलामी सामन्यात भारताची सुरुवातीची फळी फेल ठरली. रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल दमदार खेळी करत 200 धावांचा पाठलाग करत संघाला विजय मिळवून दिला.

दुसरीकडे, अफगाणिस्तान संघात फिटनेसशी संबंधित कोणतीही समस्या नाही. संघाला घरच्या मैदानावर भारताला कडवे आव्हान द्यायचे आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. आज दिल्लीत हवामान क्रिकेटसाठी अनुकूल असेल. आज दिल्लीत हवामान अंशतः ढगाळ असेल पण पावसाची शक्यता फारच कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कमाल तापमान 35-37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19-23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. त्यामुळे चाहते आजच्या सामन्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com